एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) जिल्हा परिषद नागपूर
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) ही केंद्र पुरस्कृत योजना असून ती २ ऑक्टोबर १९७५ रोजी सुरू करण्यात आली. या योजनेची सुरुवात महाराष्ट्रातील धरणी (अमरावती) आणि धारावी (मुंबई) या दोन प्रकल्पांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश बालकांची पोषणस्थिती सुधारणे तसेच बालमृत्यू आणि कुपोषण कमी करणे हा आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण २० बाल विकास प्रकल्प कार्यालये कार्यरत आहेत. त्यापैकी: १२ प्रकल्प ग्रामीण भागात, ०१ प्रकल्प आदिवासी भागात, ०७ प्रकल्प शहरी भागात आहेत. नागपूर जिल्ह्यात एकूण 3404मंजूर अंगणवाडी केंद्र असून ग्रामीण भागात त २२१२तर शहरी भागात ११९२ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत.

