परिचय
नागपुर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे जि.प. ची संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करतांना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करतांना जि.प. मधील विविध योजना व त्याची परिपुर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जि.प. मध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल.
जिल्हा परिषद हा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील सर्वांत महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्र णासनाने १ मे १९६२ पासून जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती स्थापन करून सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले आहे. या त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेकडे विकासाची कामे सोपवून ग्रामीण जनतेची आर्थिक व सामाजिक उन्नती करण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामीण विकासाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी व योजनांचा लाभ शेवटच्या घटका पावेतो पोहचविण्याचे काम प्रामुख्याने जिल्हा परिषदे मार्फत पंचायत समिती व ग्रामपंचायत द्वारे करण्यात येते, ग्रामिण विकासाच्या कार्यक्रमात नागपूर जिल्हा परिषद ही सुरूवाती पासूनच महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे अवलोकन केल्यास जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेशातील छिंदवाडा व शिवनी जिल्हा, पूर्वेस भंडारा, दक्षिणेस चंद्रपूर आणि पश्चिमेस वर्धा जिल्हा आहे. नागपूर जिल्हा उत्तर व अक्षांश २०.३० ते २१.४४ व पूर्व रेखांश ७८.१५ ते ४९.४० वे दरम्यान पसरला आहे. जिल्ह्यातील हवामान विषम स्वरुपाचे असून उन्हाळ्यात उष्ण तर हिवाळ्यात थंड असते. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०३७.५० मि.मि. आहे.
राजा बख्त बुलंद शहा यांनी अठराव्या शतकात नागपूरची निर्मिती केली. पुढे भोसले घराण्याने नागपूरला आपली राजधानी केली. भोसले घराण्याच्या हास होवून ब्रिटिश राजवटीस सुरवात झाली. मध्य प्रांत व वन्हाड याची राजधानी ब्रिटिशानी नागपूर येथेच ठेवली. सन १९४७ ला स्वातंत्र प्राप्तीनंतर मध्य प्रदेशाची निर्मिती झाली तेव्हापासून १९५६ पर्यंत नागपूर हे राजधानीचे ठिकाण होते.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर नागपूर करारानुसार नागपूरला उपराजधानीचे स्थान देण्यात आले. नागपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९८९२ चौ. कि.मी. असून १ मे १९८१ नंतर तालुक्याची पुनर्रचना करण्यात येवून १४ तालुके निर्माण करण्यात आले. नागपूर शहर हा तालुका सोडल्यास सर्व तालुक्याचे मुख्यालय पंचायत समितीचे जे मुख्यालय आहे तेच ठेवण्यात आले. २०११ चे जनगणनेप्रमाणे नागपूर जिल्ह्यात २१ गणना शहरे आहेत, २०११ च्या जनगणनेनुसार एकूण १८६४ वेडी असून त्यापैकी १६०९ लोकवस्ती असलेली व २५५ ओसाड खेडी आहेत जिल्ह्यामध्ये ७६४ ग्राम पंचायती आहेत.
भौगोलिक दृष्ट्या नागपूर जिल्हा साधारणतः तिन विभागामध्ये विभागला जातो. उत्तरे कडील टेकड्यांचा प्रदेश, पश्चिमेकडील डोंगराळ भाग व कव्हान वेणा नदीच्या खोऱ्यातील सखलभाग, रामटेकच्या टेकडीवर प्रसिद्ध कालीदास स्मारक उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील कन्हान खोऱ्यात कोळसा, खापा, सावनेर व रामटेक विभागात मॅगनिज, भिवापूर व उमरेड तालुक्यात कच्चे लोखंड, चुनखडी दगड, रामटेक व सावनेर तालुक्यातील कांद्री, पटगोवारी व देवलापार विभागात डोलामाईट दगड फार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. जिल्ह्याच्या पश्चिम सिमेवरून वर्धा व पूर्व सिमेकडून वैनगंगा नदी वाहते. कन्हान व पेंच नदीपासून नागपूर शहरास पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो.
नागपूर जिल्ह्यात प्रामुख्याने काळी, मोरड, खरडी व बरही जमीन आढळून येते. मध्यम काळी जमीन कापसाचे उत्पादना करिता उपयुक्त समजली जाते. या जिल्ह्यात मोरड प्रकारची जमीन सर्वच तालुक्यामध्ये आढळून येत असुन ज्वारीच्या पिकाकरिता उपयुक्त समजली जाते.
२०११ चे जनगणनेप्रमाणे नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४६,५३,५७० आहे. त्यापैकी ग्रामीण लोकसंख्या १६,०३,७०७ इतकी आहे. जिल्ह्यामध्ये उद्योगाचे विकासाकरिता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मार्फत हिंगणा व बुटीबोरी येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेने शासकीय अनुदानातुन तसेच इतर कार्यक्रमातुन आणि जिल्हापरिषद व पंचायत समिती सेस फंडातुन घेतलेल्या विविध योजना अहवाल वर्षात यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्याबाबतची रवाते निहाय माहिती सोबतच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे. अहवालाच्या भाग १ मधील प्रकरणात २ ते १५ परिशिष्ट अ व ब मध्ये जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखाची आणि भाग २ मधील प्रकरण १ ते ७ आणि परिशिष्ट अ व ब मध्ये पंचायत समित्या संबंधी सविस्तर माहिती निर्धारीत प्रपत्रात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे सुधारणा नियम १९६६ तसेच १९८१ चे अनुषंगाने दिलेली आहे.
अहवाल वर्षात ग्रामीण विकासाच्या अनेक योजना सर्व दूर पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष, मा. उपाध्यक्ष विषय समितीचे मा. सभापती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी तसेच पंचायत समित्याचे मा. सभापती, मा. उपसभापती व सब्मा, सदस्य याशिवाय जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सन्मा. सरपंच, सन्मा. उपसरपंच आणि सब्मा, सदस्य या सर्वांनी सक्रिय सहकार्य दिले याबाबत सर्वांचे आभारी आहे. नागपूर जिल्हा परिषद पुढील काळात सुद्धा ग्रामीण विकासासाठी प्रयत्नशील राहील व अग्रेसर राहील हा विश्वास व्यक्त करते.
अनु. क्र. | बाब | आकडेवारी |
---|---|---|
1 | एकुण पंचायत समित्या | १३ |
2 | ग्राम पंचायती | ७७० |
3 | लोकवस्ती असलेली गावे | 1,621 |
4 | एकुण लोकसंख्या | 40,67,637 |
5 | ग्रामीण लोकसंख्या | 17,38,200 |
6 | अनु-जाती लोकसंख्या | 279854 (16.10 टक्के) |
7 | अनु-जमाती लोकसंख्या | 214878 (12.36टक्के) |
8 | एकुण कुटुंब सख्या (APL) | 234696 |
9 | एकुण कुटुंब सख्या (BPL) | 91873 |
10 | एकुण ग्रामिण साक्षरतेचे प्रमाण | 78.95 टक्के |
11 | ग्राम पंचायत सदस्य संख्या | 6556 |
12 | स्त्री सदस्य संख्या | 2369 |
13 | पुरूष सदस्य संख्या | 4187 |
14 | अनु.जाती सदस्य संख्या | 705 |
15 | अनु.जमाती सदस्य संख्या | 703 |
16 | भौगोलीक क्षेत्र | 9,81,000 हे. |
17 | जंगलाचे क्षेत्र | 1,59,000 हे. |
18 | पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र | 5,74,000 हे. |
19 | खरीप पिकाखालील क्षेत्र | 4,80,757 हे. |
20 | रब्बी / उन्हाळी पिकाखालील क्षेत्र | 1,45,840 हे. |
21 | एकुण लघुसिंचन तलाव / बंधारे | 2327 |
22 | नळाद्वारे पाणीपुरवठा असलेली गावे | 1387 |
23 | वार्षिक पर्जन्यमान सरासरी | 1147.5 |
24 | प्राथमिक शाळा | 1565 |
25 | माध्यमिक शाळा | 16 |
26 | सुरू अंगणवाडीची संख्या | 2161 |
27 | ग्रामिण रुग्णालय | 9 |
28 | प्राथमिक आरोग्य केंद्र | 49 |
29 | प्राथमिक आरोग्य उपकेंद्र | 316 |
जिल्ह्याचा नकाशा