जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission)
जल जीवन मिशन ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना असून प्रत्येक ग्रामीण घराला कार्यक्षम नळजोडणी (Functional Household Tap Connection – FHTC) प्रदान करणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
उद्दिष्टे:
- प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची जोडणी
- प्रति व्यक्ती दररोज किमान ५५ लिटर पाणीपुरवठा
- पाण्याची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करणे
- स्त्रोत शाश्वतता व जलसंधारण उपाययोजना
- ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा व्यवस्थापन
अंमलबजावणी:
योजनेची अंमलबजावणी, योजना नियोजन, तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक तयार करणे, कामांची देखरेख व गुणवत्ता नियंत्रण ही जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची आहे.
इतर निधी व योजना
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुविधा बळकट करण्यासाठी विभाग खालील निधी व योजनांद्वारे कामे राबवितो:
१. 9 PHE निधी
लहान व मध्यम स्वरूपाच्या पाणीपुरवठा कामांसाठी.
२. PMKKKY (प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना)
खनिज क्षेत्रातील गावांमध्ये पाणीपुरवठा व मूलभूत सुविधा सुधारणा.
३. १५ वा वित्त आयोग निधी
ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता कामांसाठी.
४. जिल्हा नियोजन समिती (DPC) निधी
जिल्हास्तरीय प्राधान्यक्रमानुसार योजना मंजुरी व अंमलबजावणी.
५. पाणीटंचाई कार्यक्रम
उन्हाळी हंगामात टंचाईग्रस्त गावांमध्ये तात्पुरती व कायमस्वरूपी उपाययोजना.
६. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास कार्यक्रम
पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देणे.
७. आमदार स्थानिक विकास निधी
स्थानिक गरजेनुसार पाणीपुरवठा संबंधित कामे.
८. खासदार स्थानिक विकास निधी
ग्रामीण पायाभूत सुविधा व पाणीपुरवठा मजबुतीकरण.
९. स्वच्छ भारत मिशन 2.0
घन व द्रव कचरा व्यवस्थापन तसेच स्वच्छता व पाणी व्यवस्थापनाशी संबंधित कामे.
विभागाची बांधिलकी
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नागपूर हा सुरक्षित, नियमित व शाश्वत पिण्याचे पाणी ग्रामीण नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध आहे. आधुनिक तांत्रिक मानके, गुणवत्ता नियंत्रण व पारदर्शक अंमलबजावणी यांद्वारे ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्याचा विभागाचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.