बंद

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

    विभागाची भूमिका व कार्यक्षेत्र

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद नागपूर मार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, शाश्वत व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविण्यात येतात.

    विभागाकडून खालील प्रमुख कामे करण्यात येतात:

    • ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना नियोजन व अंमलबजावणी
    • नवीन बोरवेल, विहीर व स्त्रोत विकास
    • उंच जलसाठा टाक्या (ESR) व जलशुद्धीकरण संयंत्र उभारणी
    • पाईपलाईन टाकणे व विस्तार
    • पाणीटंचाई निवारण उपाययोजना
    • योजना देखभाल व दुरुस्ती कामे

    विभाग प्रमुख: इंजि. श्री अशोक गोदाबाई रामा धोंगे
    पद: कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा)
    दूरध्वनी क्रमांक: ०७१२-२५६१७८५
    ई-मेल: eebnnagpur@rediffmail.com

    जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission)

    जल जीवन मिशन ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना असून प्रत्येक ग्रामीण घराला कार्यक्षम नळजोडणी (Functional Household Tap Connection – FHTC) प्रदान करणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

    उद्दिष्टे:

    • प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची जोडणी
    • प्रति व्यक्ती दररोज किमान ५५ लिटर पाणीपुरवठा
    • पाण्याची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करणे
    • स्त्रोत शाश्वतता व जलसंधारण उपाययोजना
    • ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा व्यवस्थापन

    अंमलबजावणी:

    योजनेची अंमलबजावणी, योजना नियोजन, तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक तयार करणे, कामांची देखरेख व गुणवत्ता नियंत्रण ही जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची आहे.

    इतर निधी व योजना

    ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुविधा बळकट करण्यासाठी विभाग खालील निधी व योजनांद्वारे कामे राबवितो:

    १. 9 PHE निधी

    लहान व मध्यम स्वरूपाच्या पाणीपुरवठा कामांसाठी.

    २. PMKKKY (प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना)

    खनिज क्षेत्रातील गावांमध्ये पाणीपुरवठा व मूलभूत सुविधा सुधारणा.

    ३. १५ वा वित्त आयोग निधी

    ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता कामांसाठी.

    ४. जिल्हा नियोजन समिती (DPC) निधी

    जिल्हास्तरीय प्राधान्यक्रमानुसार योजना मंजुरी व अंमलबजावणी.

    ५. पाणीटंचाई कार्यक्रम

    उन्हाळी हंगामात टंचाईग्रस्त गावांमध्ये तात्पुरती व कायमस्वरूपी उपाययोजना.

    ६. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास कार्यक्रम

    पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देणे.

    ७. आमदार स्थानिक विकास निधी

    स्थानिक गरजेनुसार पाणीपुरवठा संबंधित कामे.

    ८. खासदार स्थानिक विकास निधी

    ग्रामीण पायाभूत सुविधा व पाणीपुरवठा मजबुतीकरण.

    ९. स्वच्छ भारत मिशन 2.0

    घन व द्रव कचरा व्यवस्थापन तसेच स्वच्छता व पाणी व्यवस्थापनाशी संबंधित कामे.

    विभागाची बांधिलकी

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नागपूर हा सुरक्षित, नियमित व शाश्वत पिण्याचे पाणी ग्रामीण नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध आहे. आधुनिक तांत्रिक मानके, गुणवत्ता नियंत्रण व पारदर्शक अंमलबजावणी यांद्वारे ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्याचा विभागाचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

    जिल्हा परिषद नागपूर (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग)

    माहितीचा अधिकार कायदा २००५

     क्रमांक. पदनाम नाव संपर्क तपशील
    सहा. जन माहिती अधिकारी (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) ०७१२-२५६१७८५
    जन माहिती अधिकारी श्री. नरेंद्र मेश्राम (सहाय्यक प्रशासन अधिकारी) ०७१२-२५६१७८५
    प्रथम अपील अधिकारी इंजि.अशोक गोदाबाई रामा धोंगे (कार्यकारी अभियंता – ग्रा.प.पु.) ०७१२-२५६१७८५