छायाचित्र दालन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ड्रीम’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ड्रीम’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण केले.
‘प्रोजेक्ट ड्रीम’ अंतर्गत 100 व्हिलेज लायब्ररी, 14 आयसीटी लॅब, ‘दीदी की रसोई’, सुपर 40 आंगणवाडी व 48 गुरुकुल यांसह अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस २०२६ वस्तू व विक्री प्रदर्शनाचे आयोजन उमेद जिल्हा परिषद नागपूर -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत
राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या बुधवार दिनांक 11 मार्च, 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित आहे. करिता सर्व मा. खाते प्रमुख व मा. गटविकास अधिकारी यांनी सकाळी 9.00 वाजता रेशीम बाग मैदान
श्री विनायक महामुनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पंचायत समिती नागपूर ग्रामीण दौरा दिनांक 05/02/2026
श्री विनायक महामुनी
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा नागपूर ग्रामीण दौरा 05/02/2026
1) राणी दुर्गावती अंगणवाडी केंद्र येथे नवीन अंगणवाडी उद्घाटन झाले आणि अंगणवाडी मधल्या लहान मुलांना बॅग वाटप केले,रुईखैरी पंचायत समिती नागपूर ग्रामीण
2)सर्व अधिकारी सोबत आणि अंगणवाडी सेविका यांच्या सोबत चर्चा गट ग्रामपंचायत वेळा (हरी) पंचायत समिती नागपूर ग्रामीण.
दिनांक ४/२/२६ ला ग्रा.पं सावंगी देवळी येथे मा. विनायक महामुनी सर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजअभियान कालावधी मध्ये केलेल्या कामाची पाहणी.
दिनांक 4/2/2026 ला ग्रामपंचायत पिपळधरा अंतर्गत मोजा नागादरी येथील जिल्हा परिषद शाळेचे इनोग्रेशन चा कार्यक्रम करण्यात आला त्या कार्यक्रमाला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय महिला बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद नागपूर माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती हिंगणा माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी हिंगणा माननीय गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती माननीय सरपंच साहेब व उपसरपंच साहेब व ग्रामपंचायतचे सदस्य गण व ब्रिज द गॅप फाउंडेशनचे सर्व सदस्य गण उपस्थित होते ब्रीद गॅप फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्यामार्फत नागाझरी येथे जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम करण्यात आले त्या शाळेचे उद्घाटन आज करण्यात आलेले आहे
SKOCH पुरस्कार 2025
मिशन बाल भरारी – भारतातील पहिली AI अंगणवाडी – जिल्हा परिषद नागपूर, महाराष्ट्र
वर्ग: शिक्षण
उपश्रेणी: अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन
प्रकल्प: मिशन बाल भरारी – भारतातील पहिली AI अंगणवाडी
दवाखाना आपल्या दारी – आरोग्य सेवा तुमच्या दारी – जिल्हा परिषद नागपूर
श्रेणी: आरोग्य
उप-श्रेणी: आरोग्य सेवा आणि प्रवेश
प्रकल्प: दवाखाना आपल्या दारी -आरोग्य सेवा तुमच्या दारी
प्रारंभ तारीख: 2026-01-10
संस्था : जिल्हा परिषद नागपूर
प्रतिसादक: श्री विनायक प्रकाशराव महामुनी
प्रारंभ तारीख: 2026-01-10
संस्था: जिल्हा परिषद नागपूर, महाराष्ट्र
प्रतिसादक: श्री विनायक प्रकाशराव महामुनी
नवसखी उद्योगिनी योजना – 2025
“उमेद” च्या महिला बचत समूहांसाठी १ लाख रुपयांची “नवसखी उद्योगिनी योजनेचा” शुभारंभ
“नवसखी उद्योगिनी योजना” ही ग्रामीण भागातील महिला बचत समूहातील महिलांसाठी विकसित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योग उभारण्यासाठी रक्कम रुपये १ लक्ष निधी विना व्याजी उपलब्ध करून दिला जाणार आहे. महिलांनी उद्योग उभारून आपल्यासह आपला जिल्हा सक्षम करण्यासाठी जिद्दीने उभे राहायचे आहे, आपल्या माध्यमातूनच आपला जिल्हा सक्षम होईल आणि तुमची प्रगती साध्य झाल्यास आम्हाला आनंद होईल असे प्रतिपादन श्री.चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांनी केले.