बंद

    जिल्हा स्तरीय एकल महिला सक्षमीकरण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

    महाराष्ट्रात एकल महिलांचे वाढते प्रमाण लक्षात घेता एकल महिलांसाठी उद्योग निर्मितीचे एक विशेष धोरण शासन राबवीत असून त्यात उमेद अभियानाचा मोठा वाटा आहे. एकल महिला या मानसिक व कौटुंबिक एकट्या पडतात. परंतु त्या सक्षम नाहीत असे मुळीच नाही. त्यामुळे राज्यात सर्व एकल महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम उमेद अभियान करीत आहे असे प्रतिपादन प्रसिध्द लेखक हेरंब कुलकर्णी यांनी केले.