बंद

    नवसखी उद्योगिनी योजना – 2025

    “उमेद” च्या महिला बचत समूहांसाठी १ लाख रुपयांची “नवसखी उद्योगिनी योजनेचा” शुभारंभ
    “नवसखी उद्योगिनी योजना” ही ग्रामीण भागातील महिला बचत समूहातील महिलांसाठी विकसित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योग उभारण्यासाठी रक्कम रुपये १ लक्ष निधी विना व्याजी उपलब्ध करून दिला जाणार आहे. महिलांनी उद्योग उभारून आपल्यासह आपला जिल्हा सक्षम करण्यासाठी जिद्दीने उभे राहायचे आहे, आपल्या माध्यमातूनच आपला जिल्हा सक्षम होईल आणि तुमची प्रगती साध्य झाल्यास आम्हाला आनंद होईल असे प्रतिपादन श्री.चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांनी केले.