लघु उद्योगांसाठी शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी आर्थिक सहावा
उद्दिष्ट:
सूक्ष्म उद्योगांसाठी अपंग व्यक्तींना आर्थिक मदत करणे.
अटी आणि शर्ती..
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे.
- अपंग व्यक्तीकडे किमान ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व प्रमाणपत्र असावे.
- वार्षिक उत्पन्न रु. १.०० लाखांपेक्षा कमी असावा.
लाभाचे स्वरूप:
बँकेमार्फत ८०% व्यावसायिक कर्ज आणि २०% किंवा जास्तीत जास्त ३०,०००/- रुपये अनुदान स्वरूपात आर्थिक मदत.
लाभार्थी:
शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती
फायदे:
१. बँकेमार्फत ८०% व्यावसायिक कर्ज आणि २०% किंवा जास्तीत जास्त रु.३०,०००/- अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य. १.५० लाख पर्यंत.
अर्ज कसा करावा
संपर्क:
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी.
२. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर/उपनगर.